दापोली:
दापोली तालुक्यातील पोफळवणे येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे दाखल करण्यात आली आहे. दापोली पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान वाजता अल्पवयीन मुलगी घरीच झोपी गेली. मात्र १६ फेब्रुवारी रोजी सकाळी 'अल्पवयीन मुलगी घरी कोठेच दिसली नाही. तिच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार ती रोज चुलीत विस्तव पेटवून आंघोळ करून शाळेत जाते. मात्र १६ तारखेला सकाळी ती तसे न करताच घरातून निघून गेली होती. सकाळी पावणेअकराचे सुमारास ओळखीच्या कोणी ती मुलगी खेड रस्त्याकडे एका पिवळ्या रंगाच्या स्कूलबसमधून जाताना दिसल्याचे सांगितले. त्या वेळी 'त्या' मुलीच्या वडीलाना ती आधार कार्ड अपडेट करायला तिला जायचे होते म्हणून गेली असेल असे वाटले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेक परत न आल्याने तिला तिच्या वडीलांनी फोन लावला असता तो बंद आला. त्यानंतर तिचे शिक्षक आणि मैत्रीणींकडे चौकशी केली असता तिची माहिती न मिळाल्याने अखेर उशिराने संजय पिंपळकर यांनी तक्रार दिली. त्यानुसार दापोली पोलीस स्थानक येथे भादविक ३६३ नुसार अज्ञाताने फुस लाऊन पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मपोहेकाँ साक्षी गुजर करित आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा