वा. च्या सुमारास कोंडमळा चिपळूण येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आब्रार जावेद,जोया आब्रार मुजावर (30, सावर्डे, चिपळूण),यांचे स्वतःच्या मालकीचे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये पुष्करसिंग कुमरेसिंग कोश्यारी (32, रा. कोंडमळा, चिपळूण, मूळ उत्तराखंड) हा आचारी होता. मात्र त्याला 3 फेब्रुवारी रोजी कामावरून काढण्यात आले. याचा राग त्याने मनात धरुन जावेद यांच्या हॉटेलमधील मार्बल टेबलची तोडफोड केली. यावेळी आब्रार, जोया व नितीन पंढरीनाथ पवार (46, आंगवली, देवरुख) या तिघांनी कोश्यारी याला हातातील लाकडी काठीने डोक्यात, हातापायावर व पाठीवर मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली अशी तक्रार पुष्करसिंग कोश्यारी याने पोलीस स्थानकात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादविकलम 324, 323, 504, 506,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार गमरे करत आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा