अटक करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणार्या संतोष विश्वनाथ जगदाळेला (रा.सासवड,पुणे) न्यायालयाने शुक्रवारी 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
गेले वर्षभर तो पोलिसांना चकवा देत होता. रत्नागिरी शहरातील प्रियंक साळवी यांनी26 सप्टेंबर 2021 रोजी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संतोष जगदाळे याने ओळखीचा फायदा घेत गाडीचे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडून सुमारे 7 लाख रुपये रक्कम घेतली होती. परंतु वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही पैसे परत न दिल्याने संतोष जगदाळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु तेव्हापासून संतोष जगदाळे हा गायब झाला होता.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा