रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा या ठिकाणी सौर पॅनल बसविण्याचा प्रस्ताव: अध्यक्ष विक्रांत जाधव यांची माहीती
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या इमारतींमधील विज बिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सौर ऊर्जेचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उप केंद्रे या ठिकाणी छतांवर सौर पॅनल बसविण्याबाबत प्रस्ताव सुचविला आहे. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उप केंद्रे यांचे विज बिल भरण्याचा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विजेचा वापर कमी करण्यासाठी सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जेचा वापर केल्यास विज बिले कमी रक्कमेची येण्यास मदत होईल. हा आर्थिक ताण जिल्हा परिषदेला कमी होऊ शकतो. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या एका ऑनलाईन बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सदरचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहीती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली. जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा उपाय करु शकतो अशी माहीती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा