रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज मिरवणे येथील जंगलमय भागात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी चालविणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ५.४० वाजता करण्यात आली.
पोलिसांनी प्रशांत जगन्नाथ पंडित (वय ४४, रा. नाणीज सोनारवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याने मिरवणे येथे आपल्या ताब्यात
गावठी हातभट्टी दारू बाळगली असता पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ८१० रुपयांची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा