Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरची नवी रहस्यं कोणती आहेत?

⏺️रायगड किल्ल्यावर 300 पेक्षा अधिक वाडे होते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. इतिहासाच्या पुस्तकांत तसं कधीच वाचलं नाही. पण ही माहिती शंभर टक्के खरी आहे. नुकतेच एरिअल सर्व्हेमध्ये पूर्वी असे वाडे होते याचे अवशेष दिसले आहेत. त्यातल्या 6 वाड्यांचं उत्खनन पुरातत्व खात्याने केलंय. उरलेले वाडे अजूनही प्रकाशझोतात यायची वाट पाहतायत. बीबीसी मराठीची टीम तीन दिवस रायगडावर फिरून तज्ज्ञांकडून या कामांची माहिती समजून घेत होती. रायगड किल्ल्यावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होतंय. गेली तीन वर्षं हे उत्खनन सुरू आहे. गेली अनेक शतकं मातीच्या आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली दडलेला रायगडचा नवा इतिहास त्यामुळे प्रकाशात येऊ शकेल. 

⏺️रायगडावरचा संपूर्ण परिसर साधारण बाराशे एकर इतका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली रायरी किल्ला जिंकला आणि त्याचं रायगड हे नामकरण करत 1662 मध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केला. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली. आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. पण आता या उत्खननामुळे शिवकालीन वाड्यांसोबतच मातीची भांडी, आभूषणं, कौलं अशा अनेक गोष्टी सापडतायत. या उत्खननाखेरीज रायगडावर वास्तूचं जतन आणि संवर्धन देखील सुरू आहे. रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व खातं यांच्या तज्ज्ञ टीम्स हे काम करतायत. राज्य सरकारने या कामासाठी 606 कोटींचा निधी मंजूर केलाय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतका निधी एखाद्या ऐतिहासिक वास्तूला प्रकाशात आणण्यासाठी दिला जातोय.

⏺️जिजामाता वाडा आणि ते आसन
रायगडावरचं उत्खनन आणि संवर्धनाचं काम पाहण्यासाठी आम्ही पोहचलो. गडाकडे जाताना पायथ्याच्या डाव्या बाजूला शिवाजी महाराजांच्या आई जिजामातांचा वाडा दिसतो. जवळपास साडे नऊ एकरमध्ये या वाड्याचा परिसर आहे. या वाड्यात चार विहीरी आहेत. त्यातल्या एका विहीरीजवळ एक उशीच्या आकाराचा आणि बसण्याच्या आसनाच्या आकाराचा एक दगड आहे. "तिथे जिजामाता टेकून बसत आणि छत्रपती शिवराय त्यांच्या पायाशी बसून हितगुज करत असल्याची कहाणी प्रसिद्ध आहे." म्हणून या विहीरीला तकियाची विहीर म्हणतात. या वाड्याच्या जोत्यांचंही उत्खनन केलं जाणार आहे. तिथून पुढे गेल्यानंतर एका उंच बुरूजावर लावलेला किल्ले रायगडचा फलक दिसतो. त्या बुरूजाचं नाव खुबलढा बुरूज... तिथून वर जाण्यासाठी दगडी पायर्‍यांचा छोटा रस्ता आहे. पूर्वी तिथून वर जाण्यासाठी छोटा रस्ता होता. पण आता गडाचं संवर्धन करताना पायर्‍यांचा दगडी रस्ता करण्यात आला आहे. पण बघताना या रस्त्यावरच्या पायर्‍या काही वर्षांपूर्वीच्या असल्यासारख्या वाटतात.

⏺️"छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्यांच्या बांधणीमध्ये एक रांगडेपणा जाणवतो. या किल्याचं संवर्धन करताना तो रांगडेपणा कायम राहावा असा आमचा प्रयत्न आहे." रायगड विकास प्राधिकरणाचे आर्कीटेक्ट वरूण भामरे सांगत होते. वरूण हे कन्झरव्हेशन आर्कीटेक्ट आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते रायगड विकास प्राधिकरणाच्यामार्फत गडाचं जतन आणि संवर्धनाचं काम करतायत. याआधी त्यांनी युनेस्कोच्या काही प्रकल्पांमध्ये संवर्धनाचं काम केलंय. रायगडाच्या कामाची माहिती देण्यासाठी ते आमच्या सोबत होते.

⏺️चुना, गुळ, उडीद डाळ आणि वाळू
पुढे आम्ही खूबलढा बुरूजावर गेलो. तिथे दगडांना नंबर्स देण्याचं काम सुरू होतं. आसपासच्या परिसरात मिळालेले दगड हे याच बुरूजाचे असल्याचे संशोधन केल्यानंतर तज्ज्ञांच्या लक्षात आलं. त्यामुळे हेच दगड पारंपारिक मिश्रण वापरून बुरूजावर लावले जात होते.नेहमीच्या बांधकामापेक्षा हे मिश्रण वेगळं होतं. आर्किटेक्ट वरूण भामरे त्या कामावर देखरेख ठेवत होते. वरूण यांनी माहिती दिली की, "पुरातत्व विभागाच्या नियमानुसार इथे सिमेंट क्रॉंक्रीट वापरता येत नाही. त्यामुळे जुन्या बांधकाम पद्धतीचा वापर केला जातो. या मिश्रणात चुना, बेल फळाचं पाणी, गूळ, उडीद डाळ, वाळू, विटांची भुकटी हे वापरलं जातं."

⏺️नाणे दरवाजा पुन्हा उभा राहणार?
साधारण 15-20 मिनिटं चालल्यावर समोर समांतर अश्या दोन गोलाकार दगडी कमानी दिसतात. हाच तो शिवकालीन राजदींडीचा मार्ग म्हणजे दरवाजा. नाणे दरवाज्याला लागून वरती एक उंच बुरुज आहे. जवळच एक छोटंस हनुमानाचं मंदिर. याच नाणे दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराज येत-जात असल्याचे संदर्भ आहेत. इंग्रज वकील हेन्री ओकझेडन यांनी शिवराज्याभिषेकाला या दरवाज्यातून प्रवेश केल्याचं ऐतिहासिक दस्तावेज सांगतात. नाणे दरवाजा डोंगराच्या कुशीत मध्यभागी आहे, म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या येण्याजाण्यासाठीचा सुरक्षित मार्ग असावा. याच नाणे दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराज येत-जात असल्याचे संदर्भ आहेत. 

⏺️इंग्रज वकील हेन्री ओकझेडन यांनी शिवराज्याभिषेकाला या दरवाज्यातून प्रवेश केल्याचं ऐतिहासिक दस्तावेज सांगतात. नाणे दरवाजा डोंगराच्या कुशीत मध्यभागी आहे, म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या येण्याजाण्यासाठीचा सुरक्षित मार्ग असावा.रोप वे च्या एक्झिटपासून पुढे उजव्या हाताला दगडी जोते आणि त्यावर विटांचं बांधकाम दिसत असलेली एक वास्तू दिसते. हाच तो उत्खनन केलेला पहीला वाडा. याच वाड्यामध्ये शिवकालीन जवळपास 800 छोट्या मोठ्या वस्तू सापडल्या आहेत. कौलं, मातीची भांडी, लोखंडी खिळे, दारूगोळे त्याचबरोबर काही दागिनेही सापडले आहेत.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा