रत्नागिरी प्रतिनिधी:-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे नव्याने सुरु झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शनिवारी आढावा घेतला. यावेळी पदवी, पदविका व औषधनिर्माण शास्त्र या विभागांची माहिती मंत्री महोदयांनी घेतली.
बैठकीला शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ए.एम. जाधव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. खंते, शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी. मराठे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, वीणा पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच महाविद्यालयाच्या आवारातील रस्ते व अन्य सुशोभिकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत मंत्रीमहोदयांनी संबंधितांना दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. खंते यांनी महाविद्यालतील अध्यापनाचे कामकाज, विषय, विद्यार्थीसंख्या, प्रवेशप्रक्रिया, शिक्षक, अद्यावत वाचनालय, संगणक कक्ष इत्यादी बाबींची माहिती मंत्रीमहोदयांना दिली. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Free Reporter Training

Certified & full Corse Residential & Onlin e
Home
/
रत्नागिरी
/
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आढावा
-
Blogger Comment
-
Facebook Comment
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा