रत्नागिरी - भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सबलीकरणाच्या हेतूने महिला विकास कक्ष अंतर्गत कशेळी गावाच्या सरपंच प्रा. सोनाली मेस्त्री यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
मुलाखतीत प्रा. सोनाली मेस्त्री यांनी शाळा महाविद्यालय , उच्च शिक्षण ते सरपंच हा संपूर्ण प्रवास सांगितला. सरपंच होताना आणि सरपंच झाल्यानंतरचे काही किस्से सांगितले. त्यांच्या पक्षी निरीक्षणाच्या आवडीबाबतचे अनुभव कथन केले. प्रत्येक महिलेने स्वावलंबी असावे असे मतही व्यक्त केले. सर्वानी करिअर करताना प्लॅन ए ,बी, सी असे तयार करावेत जेणेकरून धडपड करत विद्यार्थी यश संपादन करेल. सर्व विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे सामर्थ्य ओळखावे आणि त्यासाठी संपूर्ण प्रयत्न करावेत असा संदेश दिला.
मुलाखतीत प्रा. सोनाली मेस्त्री यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील आणि उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव यांनी केले आणि प्रा. सोनाली जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा