Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

युद्धाचे ढग दाटले??पुतीन यांना भेटण्यास बायडन तयार, पण घातली 'ही' अट

मॉस्को : 
युक्रेनचे संकट टाळण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, बैठकीपूर्वी पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला न करण्याचे आश्वासन द्यावे, अशी अट बायडन यांनी ठेवली आहे. सर्व काही ठीक राहिले, तर या आठवड्याच्या शेवटी दोन्ही नेत्यांमध्ये भेट होऊ शकते. या बैठकीची वेळ आणि मुद्दे अद्याप ठरलेले नाहीत, असे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने म्हटले. त्याच वेळी आणखी एका अधिकाऱ्याने अशी शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे, न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
⏺️आता रशियालाही धोका
युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान रशियासाठी अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. रशियातील अमेरिकन दूतावासाने मॉस्को, सेंट पीटर्सबर्गसह अनेक शहरांवर हल्ल्याचा इशारा दिला आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान रशियाच्या अनेक शहरांमध्ये शॉपिंग सेंटर्स, रेल्वे आणि मेट्रो स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणांवर हल्ले होऊ शकतात, असे मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे. 'अमेरिकन दुतावासाकडून रशियाला सुरक्षेचा महत्त्वपूर्ण इशारा', असे अमेरिकेच्या दूतावासाचे प्रवक्ते जेसन रेबोल्झ यांनी सोशल मीडियावर एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

⏺️रशियातून एक्झिट प्लॅन तयार करा
अमेरिकन दूतावासाने एका अलर्टमध्ये म्हटले आहे - गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मित्र आणि कुटुंबियांसोबत तुमच्या सुरक्षिततेची माहिती शेअर करा. पर्यटन स्थळांवर सतर्क रहा आणि रशियातून बाहेर पडण्याची योजना तयार ठेवा. यासोबतच दूतावासाने अमेरिकन नागरिकांना रशियन व्हिसा आणि अमेरिकन पासपोर्टसह मूळ ओळखपत्र बाळगण्याचे आवाहन केले आहे.

⏺️बायडन - मॅक्रॉनमध्ये फोनवरून संवाद
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी रशियाची सैन्य कारवाई रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा केली. अध्यक्ष बायडन यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर चर्चा केली, असे व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी रशियाच्या सैन्य कारवाईला प्रत्युत्तर म्हणून करण्यात येत असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा केली. तसेच युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला.

⏺️युक्रेनवर हल्ला करण्याचा आदेश
व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या आठवड्यात रशियन सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जो बायडन यांनी याबाबत जाहीर घोषणा केली. मात्र, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला, असे वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पुन्हा एकदा रशियावर फाल्स फ्लॅग ऑपरेशन सुरू ठेवल्याचा आरोप केला. त्याचवेळी, रशियाने युद्धाचे निमित्त रचण्यासाठी विविध पटकथा तयार केल्याचेही एका इशाऱ्यात सांगण्यात आले आहे. त्यामुळे रशियाचा पुढचा हल्ला कोणत्या प्रकारचा असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

⏺️रशिया संपूर्ण युद्धाच्या तयारीत!
युक्रेनजवळ तैनात असलेल्या १.५० लाख रशियन सैनिकांपैकी ४० ते ५० टक्के लवकरच पूर्ण युद्ध सुरू करू शकतात, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन गुप्तचर अहवालात म्हटले आहे. रशिया सीमेवर हल्ले करून युक्रेनला युद्धासाठी चिथावत आहे, मात्र आता त्याच्या पुढील पावलाबाबत कोणतीही ठोस माहिती नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा