Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी:प्रियकराने लग्नास नकार दिल्याने;तरुणीची पेटवून घेत आत्महत्या

लांजा येथे मामाच्या घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीने प्रेमप्रकरणातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना 31 जानेवारी रोजी सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,युक्ता राजेश कोतापकर (16, रा. वरळी मुंबई) हिचे
शेजारी राहणाऱ्या योगेश जाधव (21) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. युक्ता ही 4 जानेवारी रोजी लांजा वाकेड येथील मामाच्या घरी राहण्यासाठी आली होती.
मुंबई येथे राहणाऱ्या प्रियकराबरोबर तिचे बोलणे चालू असायचे. मात्र एकदिवस तिने प्रियकराला लग्नाविषयी विचारले. मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्याने युक्ता
हिने टोकाचे पाऊल उचलले. 27 जानेवारी रोजी तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नातेवाईकांनी तिला प्राथमिक उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण
रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्येत अधिकच बिघडल्याने मुंबई येथील
के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद वडील राजेश कोतापकर(47,वरळी,मुंबई) यांनी दाखल केली

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा