चिपळूण:
घराचे लोखंडी ग्रील काढून घरात प्रवेश करीत चोरट्याने ७६ हजार १४४ रुपये किमतीच्या २ सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. या प्रकरणी एका चोरट्यावर अलोरे शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष मंगेश मोहिते (२४, अलोरे देऊळवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याची फिर्याद समिंद्र सखाराम गुरव (४०, अलोरे देऊळवाडी) यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२१ रोजी मनीष याने गुरव यांच्या घराच्या बाथरूमचे लोखंडी ग्रील काढून त्यावाटे घरात प्रवेश करून हॉलमधील लाकडी कपाटातील ७६ हजार १४४ रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेल्या. याप्रकरणी मोहिते याच्यावर अलोरे - शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा