खेड:
खेड तालुक्यातील आवाशी माळवाडी येथे अवैध जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी टाकलेल्या अचानक धाडी मध्ये ८५० रुपयाची रोकड जुगार साहित्य जप्त करत ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवाशी माळवाडी येथे विजेच्या पोलखाली ३ पत्त्याचा खेळ पैसे लावून पत्त्याचा अवैध जुगार खेळत असल्याची गोपनीय माहीती पोलीसांना मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीसांनी बुधवार सायंकाळी ५.३० वाजता अचानक धाड टाकली. या धाडीत ८५०- रू. रोकड, इतर जुगाराचे साहीत्य जप्त केले. तर नितेश आनंदराव जाधव (वय ३७), मदन जालिंदर कदम (वय ३६), रतन तुकाराम आंब्रे (वय ४५), चंद्रकांत भिकाजी घाटगे (वय ३५ ), रामदास केशव आंब्रे (वय ५०) , सुनिल लक्ष्मण चौगुले (वय ३५) (सर्व रा. आवाशी, माळवाडी, ता खेड) यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई पोलीस जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा