ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असते. कातळशिल्प महोत्सवात या प्रतिनिधींना निमंत्रित केले असते तर महोत्सवाचा हेतू गावागावात पोचला असता. मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. ग्रामीण भागाच्या विकासाच्या प्रक्रियेतील या महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित न करता हा कातळशिल्प महोत्सव आयोजित केला जात असेल तर त्याला अर्थ तरी काय? गावागावात महोत्सवाचे महत्त्व पोचविण्याची जबाबदारी आता काय पर्यटन विभागच करणार आहे का? सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील आदिंना कातळशिल्प जनजागृती मोहिमेत सहभागी करुन घेणार नाहित का असा सवाल उपस्थीत केला जात आहे.
रत्नागिरीतील कातळशिल्प महोत्सवात ज्या गावांमध्ये कातळशिल्प आहेत त्या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील आदींना निमंत्रित करण्यात आले आहे का?
रत्नागिरीत शासनाच्या वतीने कातळशिल्प महोत्सव आयोजीत केला जात आहे. खरे तर हा महोत्सव ग्रामीण भागात विशेष करुन ज्या गावांमध्ये कातळश्ल्प आहेत त्या गावात होणे आवश्यक होते. मात्र तसे न होता हा महोत्सव रत्नागिरी शहरात आयोजीत केला जात आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात ज्या गावांमध्ये कातळशिल्प आहेत त्या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा