श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी पाली संचालित, डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालय, डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि डी.जे. सामंत आय.टी.सी. पाली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी पाली पंचक्रोशीतील महिला व विद्यार्थिनींसाठी ग्रामीण रुग्णालय पाली यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबीर तसेच निवृत्त जि.प प्राथमिक शिक्षिका सौ. स्मितांजली सावंत यांचे महिला सक्षमीकरण या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय पालीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा मॅथ्यू व त्यांचे सहकारी यांच्या मर्गदर्शनखाली आरोग्य तपासणीमध्ये महिला व मुलींची HB, CBC, TSH, ECG, BP,शुगर या तपासण्या करण्यात आल्या.
सौ. स्मितांजली सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिला सक्षमिकारानासाठी शिक्षण, अर्थार्जन व स्व संरक्षण गरजेचे आहे असे विचार मांडले. याचबरोबर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनीनी ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’ या संकल्पनेवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या जीवनपटाचे सादरीकरण केले. तर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष विभागातर्फे ‘कर्तुत्ववान महिलांचा मागोवा’ या संकल्पनेवर आधारित राजमाता जिजाऊ ते टेनिस पटू पी.व्ही. सिंधू या स्त्रियांच्या कर्तुत्वाचे अभिनयाद्वारे सादरीकरण केले.
या कार्यक्रमामध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वीणा शिंदे यांनी केले, आभार प्रदर्शन वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. दिपाली कीर यांनी केले.
या शिबिराचा महिला व विद्यार्थीनिंनी बहुसंख्येने लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तीनही विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा