सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत जल जागृती सप्ताह साजरा केला जात आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हर घर नल से जल हे अभियान राबवले जात आहे. रत्नागिरीतील कोतवडे गावातील मुस्लिमवाडी हे महसूल गाव हर घर नल से जल 100% नळजोडणी पूर्ण असल्याकारणाने राज्यस्तरावरील सूचनानव्ये बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी कोतवडे मुस्लिम वाडी हे गाव 100% नळजोडणी (एफ एच टी सी) पूर्ण गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
युनिसेफचे राज्यस्तरीय प्रतिनिधी श्री साठे ( पुणे ) व श्री देशपांडे ( परभणी), रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक चे संचालक श्री गजानन उर्फ आबा पाटील, कोतवडे गावचे सरपंच तूफील पटेल, जिल्हा स्वच्छता व पाणी मिशन कक्षाचे श्री कुमार शिंदे, स्वच्छ भारत मिशनचे सविनय जाधव, पंचायत समिती गटसमन्वयक संजय वारेकर, उपसरपंच संतोष बारगोडे, ग्रामपंचायत सदस्या सौ चांदणी बारगिर, ग्राम विकास अधिकारी देविदास इंगळे, अंमलबजावणी साहाय्य संस्था राष्ट्रीय युवा स्वयंसेवा विकास संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ नीलम पालव, संस्थेच्या सचिव सौ मनाली साळवी, प्रकल्प समन्वयक सौ जास्मिन मुल्ला, संस्थेचे सिव्हिल इंजिनिअर रोशन खापरे, समाजशास्त्रज्ञ प्रदीप पाटील, मस्जिद कबरस्थान जमातुल मुस्लिमीन कोतवडेचे अध्यक्ष दिलावर कोतवडेकर, उपाध्यक्ष अश्फाक पटेल, ज्येष्ठ सदस्य रज्जाक कोतवडेकर, शिवसेना विभागीय कार्यालयीन प्रमुख विनायक सहस्त्रबुद्धे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कोतवडे मुस्लिमवाडी हे गाव शंभर टक्के नळजोडणी म्हणून घोषित करण्यात आले.
आलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रथमतः मुस्लिम वाडी येथील पाण्याची टाकी व विहीर याची पाहणी केली. तसेच स्वच्छ व मुबलक पाणी मिळते का याची माहिती घेतली. तद्नंतर ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे सभागृहांमध्ये झालेल्या सभेत जल जीवन मिशन अंतर्गत हर घर न से जल या योजने बाबत माहिती देण्यात आली. उपस्थितांना जल जागृती सप्ताह निमित्ताने
जलप्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच उपस्थित महिला समिती कडून पाणी गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सरपंच पटेल यांच्या माध्यमातून कोतवडे मुस्लिमवाडी महसूल गाव शंभर टक्के नळजोडणी म्हणून यावेळी घोषित करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी अब्बास कोतवडेकर, अश्फाक बारगिर, सौ संयुकता मांडवकर ,श्री लक्ष्मीकांत मयेकर, बाळू वारेकर, सौ संजीवनी पाष्टे, जावेद कोतवडेकर, मुशताक कोतवडेकर, अन्वर कोतवडेकर, शराफत शेगले, अनिस शेगले, शौकत कोतवडेकर, सिराज कोतवडेकर, निसार होडेकर, रवी माने, शौकत मुकादम, मौलाना बासीद सारंग, जैबूंनीसा शेगले, मुनिरा कोतवडेकर, फैरोझा कोतवडेकर, जैबूंनीसा कोतवडेकर, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा