रत्नागिरी:
शौचालयाच्या टाकीवरील कडाप्पा तुटल्याने
टाकीत पडून वेरळ येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली. वेरळ मधलीवाडी येथील सुभदा जगन्नाथ पंडित या सकाळी ८ वाजता फुले काढण्यासाठी घराशेजारीच्या शौचालयाच्या टाकीवरुन जात होत्या. अचानक कडाप्पा तुटला आणि त्या टाकीमध्ये पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली.त्यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.ही माहिती मुलगा सुमेध यांनी लांजा पोलिसांना दिली.
पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, तृप्ती सावंतदेसाई यांनी पंचनामा केला. अधिक
तपास राजेंद्र कांबळे हे करीत आहेत.
L
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा