रत्नागिरी:(दापोली)
मुगिज बंधारा येथील सुरेश गोरीवले यांच्या मालकीचा एक बैल व एक गाय अज्ञाताने पळवून नेल्याची घटना घडली. पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,बुधवार २ मार्च रोजी सायंकाळी ५: ३० ते गुरुवार, ३
मार्च रोजी सकाळी ६ या कालावधीत ही घटना घडली.
मुगीज बंधारा येथे असलेल्या गोठ्याचे कुलूप तोडून गाय आणि बैल (दोन्हींची अंदाजे किंमत पस्तीस हजार)चोरुन नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
असून अधिक तपास सहायक पोलिस फौजदार चव्हाण करित आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा