कोकण ! म्हणजे छोट्या-मोठ्या डोंगरकपारीने सजलेला, हिरव्यागार वनश्रीने नटलेला, निसर्गाचा वरदहस्त लाभलेला अतिशय देखणा असा परिसर. कोकणी माणूसही अगदी तसाच. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही, आपण बरं नी आपलं काम बरं. जेवढं काही परमेश्वराने दिला आहे त्यातच भागवण्याची वृत्ती जास्त, त्यामुळे एकंदरच समाधानी.
या ना त्या निमित्ताने मुंबईशी नातं जोडलेला हा चाकरमानी.. शिमगा, गणपती आणि मे महिन्यात आंबा, फणस खायला गावाकडे येणार म्हणजे येणारच.
कोकणात येण्यासाठी आधी बोट मग एसटी आणि आता रेल्वे आहेत परंतु कोकण रेल्वेची सगळी स्टेशन पुन्हा गावापासून तशी लांबच असल्यामुळे रेल्वेच्या तिकिटापेक्षा रेल्वेस्टेशन पासून गावातल्या घराकडे जायचा खर्चच जास्त अशी गावोगावी परिस्थिती. त्यात रेल्वेचे तिकीट मिळणे म्हणजे मोठ्या नशिबाचा भाग. तसं बघायला गेलं तर चारचाकी गाड्या आता घरोघरी आहेत, नायत असा नाय. परंतु पेट्रोल, गॅसच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे एका दोघांसाठी प्रत्येक वेळी गाडी घेऊन जाणं परवडेलच असं नाही.
नेमका हाच मुद्दा पकडून कोकणातल्या माणसांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही *'येताव'* हे मोबाईल ॲप दोन वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०२० मध्ये घेऊन आलो होतो. दोन महिन्यातच आपल्या कोकणातल्या जवळपास 10 हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी या ॲप मध्ये आपले नाव रजिस्टर केले व प्रवास चालू केला होता. परंतु अचानक लागलेल्या लॉकडाउनमुळे हे ॲप बंद करावे लागले होते.
आता पुन्हा शिमगा, खेळे व मे महिन्याचा सुट्ट्या येत आहेत. त्यात एसटी संपामुळे रोड वाहतुकीचे कंबरडेच मोडले आहे म्हणून अनेक प्रवाशांनी *‘येताव’* ॲप पुन्हा लवकरात लवकर चालू करा, म्हणून विनंती केलीय. त्यांच्या विनंतीचा मान राखून, कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही पुन्हा *‘येताव’* ॲप नव्या स्वरूपात सुरू करत आहेत.
आपल्याच कोकणातल्या बांधवांच्या प्रवासासाठी जर ही कल्पना उपयुक्त ठरत असेल तर आम्हाला मिळालेला देवीचा हा मोठाच आशिर्वाद आहे असे आम्ही समजू. असे मत अॅप बनवणा-या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
*येताव* ॲप सध्या वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे. अँप डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
*अँड्रॉईड मोबाईल साठी* --> https://play.google.com/store/apps/details?id=com.yetavtravel
*ॲपल मोबाईल साठी* --> https://apps.apple.com/in/app/yetav/id1612264742
*येताव : शोधा... बोला... चला... !!!*
धन्यवाद!
---
*टीम 'येताव' ॲप*
*आनंद वामनसे (पावस )* - https://wa.me/919324667322
*रुपेश चौधरी* - https://wa.me/919029773108
*सुबोध अनंत मेस्त्री (संगमेश्वर)* - https://wa.me/919221250656
*प्रसन्न हर्डीकर (सावर्डे)* - https://wa.me/918108108493
*अतिश कुलकर्णी व महेंद्र देवगडकर (गिर्ये)*
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा