Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे हाल; म्हणाले, '...आम्ही अडकलोय, प्लीज मदत करा'


हायलाइट्स:
⏺️युक्रेनच्या सुमीमध्ये अडकले सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी
⏺️पिसोचिनमध्येही भारतीय विद्यार्थी अडकले
⏺️विद्यार्थ्यांची भारतीय दुतावास आणि भारत सरकारकडे मदतीची मागणी


तिरुवनंतपूरम : रशियन सैन्याकडून युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ले ( russia ukraine war ) सुरूच आहेत. पण या युद्धाचा फटका युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. रशियापासून ६० किमी अंतरावर असलेल्या ईशान्य युक्रेनच्या सुमीमध्ये ( indian students stranded in sumy ukraine ) शेकडो भारतीय अडकले आहेत. वाढत्या हवाई हल्ल्यांमुळे सुमीमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी देशात परतण्याची मदतची मागणी करणारे संदेश पाठवत आहेत. आम्हाला सायरन आणि एअर स्ट्राईकचे आवाज ऐकू येत आहेत. आम्ही आता आमच्या बंकरमध्ये आहोत. आम्ही सध्या उच्च जोखीम आणि अनिश्चिततेत अडकलो आहोत. आम्ही रशियाच्या जवळ आहोत. सुरक्षेच्या समस्येमुळे आम्हाला युक्रेनच्या पश्चिम भागात जाणे अशक्य आहे. रशियन सीमेकडे जाण्यासाठी युक्रेन सरकारकडून कोणतीही सूचना किंवा मंजुरी मिळालेली नाही, असे सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी स्वाथिलने सांगितले.

सुमीमध्ये सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत आणि ते परतण्यासाठी वारंवार आवाहन करत आहेत. आम्ही बऱ्याच काळापासून बंकरमध्ये अडकलो आहोत. बाहेर मोठा आवाज ऐकून आम्ही इकडे धावलो. आम्ही रशियन सीमेजवळ आहेत. मात्र तेथे पोहोचण्यासाठी दीड तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. सततच्या गोळीबारामुळे आम्ही तिथे कसे जाऊ शकतो?, असे म्हणत सरकारकडे वैद्यकीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने मदतीची मागणी केली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
इथे वीज नाही. पाण्याची टंचाई आहे. बॉम्बस्फोटाचा आवाज आल्यावर आम्ही आमचे पासपोर्ट घेऊन बंकरकडे धावलो. आम्ही खरोखर घाबरलो आहोत, असे एका विद्यार्थिनीने व्हिडिओ मेसेजमध्ये सांगितले. आम्हाला कोणी इथून काढणार की नाही हे देखील माहिती नाही. आम्ही खारकीव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत. आता आम्ही पिसोचिनमध्ये अडकलो आहोत. इथे काहीही नाही. बस किंवा ट्रेनची व्यवस्था नाही. येथे बाहेर काढण्यासाठी कुठलीही प्रक्रिया नाही आणि दूतावासाकडून कोणतीही मदत नाही. आमच्याकडे कोणतेही अपडेट नाहीत. आम्ही पूर्णपणे अडकलो आहोत. एजंटने आम्हाला आश्रय दिला आहे. दूतावासाकडून अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. विद्यार्थ्याने भारत सरकारकडे आम्हाला मदत करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

आम्ही सकाळपासून अनेक स्फोट ऐकले आहेत. कृपया आम्हाला मदत करा. आम्ही इथे अडकलो आहोत. आमच्यासोबत अनेक महिलाही आहेत, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. पिसोचिनमध्ये अडकलेले ३०० हून अधिक विद्यार्थी भारतीय दूतावासाकडून मदत किंवा सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या २४ तासांत युद्धग्रस्त युक्रेनमधून १५ फ्लाइट्सद्वारे ३,००० भारतीयांना बाहेर काढण्यात आल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा