रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा खडपमोहल्ला, वरचा मोहल्ला, पांजरी मोहल्ला, चरकरवाडी भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असून व अनियमीत येत असून येथील नागरीकांची पाण्यामुळे गैरसोय होत असल्याने याबाबतची तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरी नगर परिषदेला सादर करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी सदरचे निवेदन केले आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील सुरु असलेल्या सुधारीत नळपाणी योजनेला सुमारे ५ वर्ष झाली असून अद्याप मिरकरवाडा खडपमोहल्ला, वरचा मोहल्ला, पांजरी मोहल्ला, चरकरवाडी इत्यादी भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असून व अनियमीत येत असून येथील नागरीकांची पाण्यामुळे गैरसोय होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी आपल्या कार्यालयाकडे केलेल्या असून आपल्याकडून सहकार्य झालेले नाही. मिरकरवाडा खडपमोहल्ला येथील प्रस्तावीत टाकीची जागा बदलून आपण येथील जनतेवर अन्यायच केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मिरकरवाडा, मुरुगवाड़ा या भागातील नागरीकांवर अन्याय झाला आहे. सध्या खडपमोहल्ला मिरकरवाडा येथील नागरीकांना MIDC चा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे त्या पाण्यावर खडप मोहल्ल्याला अवलंबून रहावे लागते. साळवी स्टॉप ते किल्ला येथील टाकी ग्रॅव्हिटी मेन जोडण्याचे काम सुरु आहे. सदर काम लवकरात पुर्ण करुन पांढरा समुद्र येथे सदरील लाईन जोडली तर लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटुन येथील जनतेला पाणी मुबलक मिळेल. त्यांना न्याय मिळेल. याबाबत आपल्याला वारंवार कळवलेले आहे. याबाबतचे पत्र दि.०५/ १०/२०२१ रोजी आपल्याकडे सादर केलेले आहे. त्यावर कार्यवाही करणे बाबतचे पत्र आपण मला जा.क्र.नपान -५ / कावि - ३१०-३१४ / ३१६ / ३१६ / २०२१ ने दि. २८/१०/२०२१ ला पाठवलेले आहे. मात्र त्याची अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यासाठी आपण स्वतः लक्ष घालून कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे शहरातील नागरीकांना योजनेच्या आराखड्यानुसार २४ तास पाणी पुरवठा करावा हि विनंती. अशा आशयाचे पत्र माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना सादर केले आहे.
Free Reporter Training

Certified & full Corse Residential & Onlin e
Home
/
रत्नागिरी
/
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा खडपमोहल्ला, वरचा मोहल्ला, पांजरी मोहल्ला, चरकरवाडी भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत चालू करावा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्याधिका-यांना निवेदन
-
Blogger Comment
-
Facebook Comment
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा