रत्नागिरी:
बंगालच्या उपसागरात प्रभावी कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यासह कोकण किनारपट्टीत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट असून आगामी दोन
दिवस मळभी वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमी दाबाच्या प्रभावाने दक्षिण महाराष्ट्र विभागातील काही भागांमध्ये
काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे.त्यामुळे ४ आणि ५ मार्च या दोन दिवसांच्या दरम्यान काही भागांमध्ये तापमान अगदी थोड्या प्रमाणात कमी होणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत ढगाळ
वातावरणाची शक्यता आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा