रत्नागिरी:
आजारपणाला कंटाळून ६५ वर्षीय प्रौढाने काजूच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे घडला
आहे.मिळालेल्या माहितीनुसार आसगे मांडवकरवाडी येथील सुरेश गुणाजी मांडवकर (वय ६५) हे गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. सध्या ते घरीच होते. अंधार पडल्यानंतर ते कोणालाही न
सांगता घरातून निघून गेले. रात्र झाली तरी ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली. रात्री ९.३० वा. धाकटा मलवट या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला. तेथे काजूच्या झाडाच्या फांदीला गळफास
लावून घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती.लांजा पोलिसांना तत्काळ या प्रकाराची माहिती देण्यात आली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा