देवरूख :
युक्रेन देशात देवरूखमधील अडकलेल्या तीनही विद्यार्थ्यांचा आपल्या देशात येण्याचा मार्ग मोकळा झाला असून शुक्रवार, दि. ४ रोजी हे विद्यार्थी परतणार असल्याची माहिती विद्यार्थिनी साक्षी नरोटे हिने दिली आहे. हंगेरी विमानतळावरून त्यांनी संवाद साधत भारतात येण्याची माहिती दिली.
एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी साक्षी नरोटे, जान्हवी शिंदे व अद्वैत कदम तीन महिन्यांपूर्वी युक्रेनला गेले होते. खारकोव्ह येथील विद्यापीठात ते शिक्षण घेत आहेत. याच विद्यापीठाच्या वसतिगृहात रहायला होते. नेहमीप्रमाणे हॉस्टेलमध्ये झोपलेले असताना राहात असलेल्या ठिकाणापासून काही किमी अंतरावरच रशियाने बॉम्ब टाकला होता. हल्ला होताच हॉस्टेलचे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. पाण्यासाठीही रांगा लावाव्या लागल्या. काही वेळातच पाणी व जिन्नस संपल्याने मॉलही बंद झाले होते. तत्पूर्वीच स्थानिक विद्यार्थी वर्गाच्या मदतीने पाणी व जिन्नस आणून ठेवल्यामुळे पुढील तीन दिवसांचा प्रश्न सुटला होता. यातच मेसही बंद झाल्याने जेवणाचा प्रश्न होताच देवरूखमधील विद्यार्थी एकत्र असल्याने एकमेकाला धीर देत हे विद्यार्थी वावरत होते. बुधवारी या विद्यार्थ्यांना हंगेरी या देशात सायंकाळी उशिरा आणले. या ठिकाणी विद्यार्थ्यांची जेवणाची सोय झाली. तीन दिवसांचा उपाशीपणा याठिकाणी संपुष्टात आला.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा