रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सेतु कार्यालयाबाहेर अर्ज लिहुन देण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात?
रत्नागिरी तहसिल कार्यालयांतर्गत येणा-या सेतु कार्यालयाबाहेर अर्ज लिहुन देण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याचे बोलले जात आहेत. प्रतिज्ञापत्र किंवा अन्य अर्ज लिहुन देण्यासाठी सुमारे पन्नास ते शंभर रुपये घेतले जातात अशी चर्चा आहे. बॉन्ड पेपर जिथे मिळतात तिथे काही विना भरती कर्मचारी बसतात. त्यांच्याकडे ओळखपत्र नसते. काही अर्ज छापील स्वरुपाचे असतात. डेमो अर्ज असतात. ते भरुन घेण्यासाठी लोकांकडून अव्वाच्या सवा पैसे घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. शिवाय पैसे दिल्यानंतर त्याची पावतीही दिली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय झेरॉक्स फोटो कॉपी हवी असल्यास तहसिल कार्यालयाच्या बाहेर जयस्तंभ येथे यावे लागते. यामध्ये लोकांचा वेळही वाया जातो. यासंदर्भात संबंधितांनी प्रत्यक्ष आढावा घ्यावा व योग्य ती कार्यवाही घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा