खरे तर किमान पाच वर्षे तरी हा रस्ता व्यवस्थीत राहणे अपेक्षीत होते. मात्र पाच वर्षाच्या आतच रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे पुढील निधी खर्ची पडण्याअगोदर पूर्वी म्हणजेच 2019 साली केलेल्या रस्त्यावर खड्डे कसे पडले असा सवाल उपस्थीत केला जात असून जिल्हा प्रशासनाची या कामाची चौकशी करावी. शक्यतो प्रत्यक्ष पाहणीच करावी आणि हा रस्ता प्रवासासाठी सुरळित चांगल्या दर्जाचा बनवावा अशा अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
रत्नागिरीतील मेरीटाईम बोर्ड कार्यालय ते पंधरामाड रस्त्यावर पडले असंख्य खड्डे, 2019 सालात केला होता हा रस्ता, जिल्हा प्रशासनाकडून चौकशी होणार का? जनतेचा सवाल
रत्नागिरीतील मेरीटाईम बोर्ड कार्यालय ते पंधरामाड या दरम्यान असलेल्या रस्त्यावर सध्या असंख्य खड्डे पडले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या विशेष रस्ता अनुदान अंतर्गत सुमारे सत्तर लाखांचा निधी खर्च करुन 2019 साली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सध्या या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून यामुळे या भागातील नागरीकांना या रस्त्यावरुन प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा