राजापुरातील शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘राजापूर श्री 2022' जिल्हास्तर शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ व बक्षीस वितरण समारंभ माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत पार पडला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही भव्य स्पर्धा पार पडली. यामध्ये जिल्हाभरातील व्यायामपटूंनी भाग घेतला होता. जिल्हास्तरीय ‘राजापूर श्री 2022' ही स्पर्धा चार गटात खेळविण्यात आली. या चार गटातून प्रत्येकी पाच जणांची निवड करण्यात आली. अंतीम स्पर्धेसाठी निवड झालेल्या वीस स्पर्धकांनी आपल्या शरीरसौष्ठवाचे शानदान प्रदर्शन केले. यामध्ये चिपळूण व्यायामशाळेच्या समीर मोरे ने बाजी मारत राजापूर ‘राजापूर श्री 2022' चा किताब पटकावला. तर या स्पर्धेतील ‘बेस्ट पोजर' म्हणून फेक्स हार्डकोअर रत्नागिरी व्यायामशाळेच्या प्रणव कांबळी याची तर ‘उगवता तारा' म्हणून आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या हर्षद मांडवकर याची निवड करण्यात आली.
तर तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धेत तीन गटात 14 स्पर्धक सहभागी झाले. त्यातून अजिंक्य कदम याने बाजी मारत ‘राजापूर श्री 2022' चा किताब पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगराध्यक्ष ऍड.जमिर खलिफे, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगरसेवक सौरभ खडपे, प्रांताधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार सौ.दिपाली पंडीत, सुशांत मराठे, रूपेश कांबळे, आफताब शेख, मनसेचे प्रकाश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
Free Reporter Training

Certified & full Corse Residential & Onlin e
Home
/
रत्नागिरी
/
‘राजापूर श्री 2022' जिल्हास्तर शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ व बक्षीस वितरण समारंभ माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत संपन्न
-
Blogger Comment
-
Facebook Comment
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा