माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या 30 रोजी सायन येथील छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस केंद्राचे होणार लोकार्पण
राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत अंतर्गत शिव कल्याण केंद्र संचलित छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस केंद्राचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस केंद्र, संजय गांधी नगर, हायवे अपार्टमेंट समोर, सायन-पनवेल हायवे, सायन, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी मंत्री आशिष शेलार, भाजपा मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच विशेष उपस्थिती म्हणुन आमदार कालिदास कोळंबकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार कॅप्टन आर.तमिल सेल्वन, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदी उपस्थित राहणार आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा