रत्नागिरीतील खेडशी गयाळवाडीत घरफोडी, 32,500 रु. किंमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरले
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गयाळवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन घरातील रोख रक्कमेसह एकूण सुमारे 32 हजारांचे दागिने चोरल्याची घटना दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. खेडशी गयाळवाडी येथील अपार्टमेंट मध्ये एका वसाहतिमध्ये राहणारे मयुर मनोहर दरेकर यांच्या घरात ही चोरी झाली असून त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी तक्रारदार हे घराचे सर्व दरवाजे बंद करुन त्याची एक चावी कामवाली हिच्याकडे नेहमीच्या जागेवर खिडकीत ठेवून नोकरीच्या ठिकाणी निघुन गेले. ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी परत आले त्यावेळी घराच्या दरवाजाच्या कोयंडा तुटलला दिसला. म्हणून त्यांनी व त्यांची आई हिने त्यांची कामवाली हिला फोन करुन खात्री केळी असता ती बारा वाजताच्या दरम्याने घरातील काम करुन दरवाजा लॉक करुन निघुन गेली असल्याचे सांगितले. अज्ञात चोरट्याने घरातील बेडरुम मध्ये असलेल्या भिंतीतील कपाटातील चावी घेऊन लोखंडी व लाकडी कपाट उघडून दोन्ही कपाटातील लॉकर कोणत्यातरी कठिण हत्याराने उचकटून दागिने व रोख रक्कम चोरली आहे. सदर घटनेत 4,000 रुपये किंमतीची 1 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 10,000 रु.किमतीची 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 5,000रु.किमतीची 1.25 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 9,000 रु.किमतीचा 1.25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा कॉईन, 500 रु.किमतीचे दोन चांदीचे कॉईन, 4,000 रु.किमतीची रोख रक्कम असा एकूण 32,500 रु. किंमतीचा एवढा मुद्देमाल चोरिला गेला आहे. सदर घटनेत अज्ञाताविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 73/2022 च्या भा.द.वि.का.कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार कांबळे करित आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा