कोकणच्या विकासाचा दस्तऐवज असलेल्या अपरान्त या अॅड.विलास पाटणे यांच्या लेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, उद्योजक दीपक गद्रे, मोहिनी पटवर्धन आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की अॅड.विलास पाटणे लिखीत अपरान्त या पुस्तकातील सर्व लेख आभ्यासपुर्ण असून कोकणातील विविध प्रश्नांची खूप चांगली मांडणी करण्यात आली आहे. कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, कोयनेच्या अवजलाचा प्रश्न, बंदर विकास अशा सर्वच प्रश्नांबाबत लेखन करण्यात आले आहे. अॅड.विलास पाटणे यांचे लेख महाराष्ट्र टाईम्स सारख्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. अशा शब्दात पुस्तकाचे कौतुक केले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वतंत्र कोकण विद्यापीठ का होऊ शकत नाही याची सविस्तर माहीती दिली. तसेच रेल्वे स्टेशनला सरकते जिन्यांची मागणी सुरेश प्रभू यांनी कशी मान्य केली, महामार्ग चौपदरीकरण आंदोलनावेळी कसे यश मिळाले या जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा