Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

धामणसे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीकांत देसाई, उपाध्यक्षपदी केशव कुळकर्णी बिनविरोध

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., धामणसे या संस्थेच्या सन २०२१-२२ ते सन २०२६-२७ या कालावधीकरीता घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये श्रीकांत वसंत देसाई यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी केशव कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

धामणसे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., धामणसे या संस्थेच्या बिनविरोध निवडून आलेल्या १२ सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वि . वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी १९ रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अध्यक्षपदी श्रीकांत वसंत देसाई यांची तर उपाध्यक्ष पदी केशव शंकर कुळकर्णी, धान्य समिती चेअरमन पदी दीपक जाधव यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत वसंत देसाई, केशव शंकर कुळकर्णी, अमर दत्ताराम रहाटे, उमेश किशोर कुळकर्णी, शांताराम भिकाजी रेवाळे, दिलीप गंगाराम तांबे, अविनाश मारुती लोगडे, विश्वास सीताराम धनावडे, तसेच महिला प्रतिनिधी म्हणून ज्योती मोहन पवार, अपेक्षा अशोक पांचाळ, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून राजेंद्र शंकर डाफळे, अनुसूचित जाती, जमातीमधून दीपक तुकाराम जाधव हे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. निवडून आलेल्या या संचालकामधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यात आले. 

     यावेळी नूतन अध्यक्ष श्रीकांत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. सलग तिसऱ्यांदा ग्रामस्थ व भागधारकांनी मला व उपाध्यक्षांना संधी दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ व भागधारकांचे आभार व्यक्त करतो व ही संस्था जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होईल यासाठी मी माझ्या सर्व संचालकांसह प्रयत्न करेन. 
      या कार्यक्रमाला सरपंच विलास पांचाळ, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे चिटणीस श्री मुकुंद जोशी, विजय निवेंडकर व सचिव सुनील लोगडे आदी उपस्थित होते. 

धामणसे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., धामणसे या संस्थेचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा