श्री वामन कदम सहाय्यक प्रशासन अधिकारी हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 मार्च 2022 रोजी निवृत्त होत असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद कला क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉक्टर इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तसेच सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री राजेंद्र महाडिक, श्री रोहन बने, श्री उदय बने हे देखील उपस्थित होते तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री परिक्षित यादव, प्रकल्प संचालक श्रीमती नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर सावंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री शेळके साहेब तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य देखील उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा