रत्नागिरी शहरात वाहतूक पोलिस असतात आणि ते अशा प्रकारच्या कारवाया करतात. राजापूरात वाहतूक पोलिस नाहित का? की पोलिस कर्मचा-यांनाच काम देण्यात येते. सदरची करावाई फक्त गुरुवारीच करायची आहे की दररोज जवाहर चौकात उभे राहून नियमबाह्य वाहन चालवणा-या लोकांवर कारवाया करायच्या आहेत? जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दररोज कारवाया करु नयेत असे काही आदेश दिले आहेत काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राजापूर तालुक्यात अद्याप एस.टी.वाहतूक सुरु नाही. रिक्षाचे भाडे देण्यास अनेकांना परवडत नाही. गुरुवारी राजापूरात आठवडा बाजार भरतो. मग अशा परिस्थितीत लोक कुणाला तरी गाडीवर बसवून राजापूरात येतात. अशा परिस्थीतीत पोलिस नियम सांगतात. पोलिसांनी नियमातच काम केले पाहिजे. आणि करतात देखील. मग पोलिसांनी सांगावे की राजापूर शहरात ड्रायव्हिंग लायसेन्स काढून देणारे कोण कोण आहेत. ते किती फी आकारणार आहेत? राजापूरात अधिकृत हेल्मेट विक्री कुठे होते?
राजापूरातून अनेक लहान मुले दररोज विना लायसन्स दू चाकी, चार चाकी गाड्या चालवतात? त्यांच्यावर किती कारवाई होते? किती गाड्यांवर नंबर प्लेट नाहियेत? किती गाड्यांवर काळ्या काचा आहेत? अशी सविस्तर तपासणी पोलिस प्रशासनाकडून केली जाते का? रत्नागिरीत हेल्मेट सक्ती होती त्या काळात वाहतूक पोलिसांनी खूप दंड आकारला. मग अशा प्रकारच्या कारवाया हेल्मेट संदर्भात राजापूर पोलिसांनी किती केल्या. असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
राजापूर शहरात गुरुवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठ परिसर, जवाहर चौक ते गुजराळी पूल या दरम्यान वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडवून नागरीकांना, पादचा-यांसाठी रस्ता मोकळा करुन दिला जातो का? की पोलिसांची केवळ कारवाई करण्याएवढीच जबाबदारी आहे?
या सर्व प्रश्नांसंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक आढावा घेणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा