जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे देवरुख मध्ये जिल्ह्यातील पहिली न्यूजरूम सुरू करण्यात आली आहे. माननीय आमदार शेखर निकम सर आमदार संगमेश्वर चिपळूण यांच्या मुलाखतीने या शाळेमध्ये व्हीएफएक्स, ॲनिमेशन, च्या द्वारे न्यूजरूम मध्ये शाळेतील विद्यार्थिनी निधी हिने शेखर सर यांची मुलाखत घेतली.
तळवडे देवरुख शाळेमधील विद्यार्थी कॉम्प्युटर वरती पत्र टाईप करतात त्याच प्रमाणे सर्व प्रकारची व्हिडिओ एडिट करतात व सभोवतालच्या बातम्या त्यांचे संकलन करून न्यूजरूम च्या माध्यमातून सतर्क राहून या बातम्यांची प्रेझेंटेशन टीव्ही प्रमाणे करतात. ग्रामीण भागामध्ये अशाप्रकारे अध्ययन अध्यापन पाहून शेखर सर भारावून गेले वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देताना लहानपणीच्या आठवणी मध्ये ते भाऊक झाले. आपल्या वडिलांचा प्रामाणिकपणा आपल्याला भावतो हे सांगताना आपली आई शिक्षिका असून वेळेबद्दल व काम करीत राहण्याबद्दल चा वारसा आपण तिच्याकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेखर सर यांनी मुलांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अतिशय चांगल्या प्रकारे उत्तरे दिली.
प्लास्टिक मुक्ती वरील शाळेच्या मुलांनी अभिनय, शूटिंग व एडिटिंग केलेला व्हिडिओ पाहून त्याचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी
यावेळी यूयुत्सू आर्ते, प्रविण टक्के भरत टक्के व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी दीपक केळकर, पुनम बोथले, श्रद्धा जोशी, व प्रविण किणे यांनी परिश्रम केले..
चंद्रकांत टक्के, संजय टक्के,सुरेंद्र
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा