हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘संघे शक्ती कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलिकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटीत होणे ही काळाची गरज आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा अविष्कार दर्शवण्याकरीता चिपळूण येथे रविवार दिनांक 15 मे रोजी दुपारी साडेतीन ते साडेसहा या वेळेत हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विरेश्वर मंदिर येथून दिंडीचा आरंभ होईल आणि बाजारपेठ मार्गे जाऊन वेसमारुती येथे सांगता करण्यात येईल. या करिता शहरासह ग्रामीण भागातही होत असलेल्या प्रसार बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये तरुणांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, वाणी आळी, पेठमाप, ओझरवाडी या भागातील बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
खडपोली, आंबडससह ग्रामीण भागातील प्रसार बैठकांना हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत अशा प्रकारे होत असलेल्या प्रसार बैठकांनाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्त्वनिष्ठ संघटना अन् संप्रदाय यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गावांमध्ये बैठका घेऊन तसेच वैयक्तिक संपर्क करुन या दिंडीचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याला सर्वच स्तरांतून उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून उद्याच्या हिंदू एकता दिंडीमध्ये वारकरी बांधव दिंडीसह,धर्मप्रेमी चित्ररथ,लेझीम पथक,ढोलताशे, सनई या वाद्यांसह सहभागी होणार आहेत. धर्मप्रेमी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात प्रसार करत आहेत. या एकता दिंडीसाठी प.पू. नरेंद्र महाराज,विविध वारकरी संघटनांच्या प्रमुखांचे तसेच अन्य सांप्रदायिक प्रमुख, संत यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभत आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या ‘हिंदू एकता दिंडी’त मोठ्या संख्येने हिंदूंनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा