गुरुवारी सायंकाळी मांडवी येथे गेलेल्या एका कुटुंबातील नातेवाईकांनी भेळ, पाणीपूरी खायची ठरवली. भेळवाल्याकडे गेल्यावर पाणीपुरी, आदी मागितले. चवित फरक जाणवला. तो ग्राहकांनी सांगितला. तीच बाब भेळ विक्रेत्याला खटकली. तो म्हणाला की मी इतके वर्षे व्यवसाय करतोय. तुम्ही काहितरी काय बोलताय. असे बोलून समोरच्या ग्राहकावर हात उचलला. सदरची माहीती त्या ग्राहकानेच सांगितली. या हातापायीमध्ये लहान मुलालाही मारले. या रुग्णाना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर तिथे पोलिस चौकित पोलिसाच उपस्थीत नव्हते. त्यामुळे तक्रारदाराना तक्रार कुठे करायची हा प्रश्न पडला. सदरची माहीती त्या ग्राहकानेच सांगितली.
अशी घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासनाकडून मांडवी भेळ विक्रेत्यांना काही नियमावली लागू केली जाणार का? भेळ, पाणी पूरी खाल्ल्यानंतर दुकानदारांकडून ग्राहकाना रितसर पावती मिळणार का?, ग्राहकांसोबत कसे वागावे याबाबत काही नियमावली दिली जाणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा